विकी कौशलचा भाऊ मराठमोळ्या मुलीच्या प्रेमात!

 
file photo
मुंबई : अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफचा नुकताच विवाह सोहळा झाला. या विवाहाची देशभरात जोरदार चर्चा झाली. या चर्चेनंतर आता विकी कौशलच्या भावाच्या रिलेशनशीपची चर्चा सुरू झाली आहे. विकी कौशलचा भाऊ सनी कौशल एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आहे. शर्वरी वाघ असं या मराठमोळ्या अभिनेत्रीचं नाव आहे.

बंटी और बबली २ या चित्रपटाद्वारे शर्वरी वाघने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र या चित्रपटापेक्षा ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच चर्चेत असते. ती सनी कौशलला डेट करत असल्याची चर्चा आहे. विकी आणि कतरिनाच्या लग्नाला शर्वरी उपस्थित होती. त्यामुळे या चर्चांना अधिकच उधाण आले. शर्वरी आणि सनी कौशल दोघेही मुंबई विमानतळावर एकत्र दिसले होते. या दोघांमध्ये नेमकं चाललंय काय, अशी चर्चा सर्वत्र सुरू होती.

दोघे लवकरच लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शर्वरी वाघने सुद्धा याविषयी खुलासा केला असून, या सर्व अफवा आहेत. आम्ही दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहोत. चार वर्षांपासून आमची चांगली मैत्री आहे, असे शर्वरीने  सांगितले. "द  फॉर्गोटन आर्मी" या वेब सिरीजमध्ये शर्वरी आणि सनी कौशल यांनी एकत्र काम केले होते. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हे शर्वरी वाघचे आजोबा आहेत. मनोहर जोशी यांची मुलगी नम्रता वाघ यांची शर्वरी ही मुलगी आहे.