"या' अभिनेत्रीने घेतले १४ कोटींचे घर!
हृतिक रोशनची शेजारी बनली
Updated: Nov 5, 2021, 17:36 IST
मुंबई ः दंगल चित्रपटातून बॉलीवूड करिअरला सुरुवात करणाऱ्या अभिनेत्री सान्या मल्होत्राने मुंबईत अलिशान घर खरेदी केले आहे. तिचे नवे घर अभिनेता हृतिक रोशनच्या घराशेजारी आहे. मुंबईतील जुहू वर्सोवा लिंक रोडवर आता ती नव्या घरात राहायला जात आहे.
जुहूतील बे व्ह्यू बिल्डींगमध्ये तिचा हा प्रशस्त फ्लॅट आहे. हा फ्लॅट पूर्वी समीर भोजवानी यांच्या नावावर होता. सान्या मल्होत्रा आणि तिचे वडील सुनील कुमार मल्होत्रा यांनी या फ्लॅटसाठी ७१ लाख ५ हजार रुपये स्टॅम्प ड्युटी भरली आहे. हा फ्लॅट सान्याला १४.३ कोटी रुपयांना पडला. गेल्यावर्षी हृतिकने याच इमारतीत १०० कोटी रुपयांत दोन फ्लॅट घेतलेले आहेत. त्याचे प्लॅट १४, १५ आणि १६ व्या मजल्यावर आहेत. सान्याने २०१८ मध्येही मुंबईत घर खरेदी केले होते. हे घर सिंगल बेडरूमच्या अपार्टमेंटमध्ये हाेते. कुटुंबासह राहता यावं म्हणून मोठा फ्लॅट घेतल्याचे तिने म्हटले आहे.