Special Interview...म्हणून वाणीने साकारली ट्रान्सजेंडरची भूमिका!
Dec 21, 2021, 10:25 IST
अमृता धारेवाल
अभिषेक कपूर दिग्ददर्शित चित्रपट ‘चंडीगढ करे आशिकी’मध्ये वाणी कपूरने ट्रान्सजेंडर (लिंगपरिवर्तन केलेल्या) मुलीची भूमिका निभावली आहे. यात तिचा नायक आयुष्मान खुराना असून, यापूर्वी वाणी ‘बेल बॉटम’ चित्रपटात अक्षयकुमारसोबत दिसली होती. ‘चंडीगढ करे आशिकी’ चित्रपटाच्या निमित्ताने वाणी कपूरशी केलेली बातचित...
- प्रश्न ः समाजात अशा विषयांवर बोलण्यासही लोक कचरतात. अभिनेत्रीला केंद्रस्थानी ठेवून अशा चित्रपटांच्या निर्मितीची किती आवश्यकता गरजेची आहे?
- वाणी कपूर ः नायिकाप्रधान चित्रपटांकरिता किती निर्माता, दिग्ददर्शक तयार होतात हे महत्त्वाचे आहे. त्यांना हिरोवर पैसे लावणे सोपे वाटते. त्यांना असे वाटते की हिरोचा चित्रपट पाहायला प्रेक्षक येतात. त्यामुळे नायिकाप्रधान चित्रपट निर्माण करण्याची त्यांना भीती वाटते. प्रेक्षक आणि निर्माता-दिग्ददर्शकांवर अवलंबून आहे की किती अभिनेत्री केंद्रीत चित्रपट मार्केटमध्ये किती यावेत... प्रेक्षकांनी रूची दाखवली तर तेही पुढे येतील. त्यामुळे सर्व काही प्रेक्षकांवर अवलंबून आहे. बेफ्रिके आणि शुद्धी देसी रोमांसमधील माझा अभिनय अभिषेक कपूर यांना चांगला वाटला होता. त्यामुळेच त्यांनी माझी निवड या चित्रपटासाठी केली.
- प्रश्न ः ट्रान्सजेंडर मुलीची भूमिका साकारताना मनात काय भावना होत्या?
- वाणी कपूर ः हा चित्रपट अत्यंत आनंदाने मी स्वीकारला. मला चित्रपटाची आयडिया, स्क्रिप्ट आणि उद्देश चांगला वाटला. अभिषेक कपूर यांच्याबद्दल मला आदर आहे. मी त्यांचे रॉक ऑन, काय पो छेसह सर्वच चित्रपट पाहिले आहेत. मला त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा आधीपासून होती. त्यांनी मला संधी. मी लगेच स्वीकारली. माझी भूमिका समाजाचा वर्जित भाग असली तरी मी आयुष्मान आणि अभिषेकसाठी ही रिस्क घेतली.
- प्रश्न ः हा चित्रपट साकारण्याआधी लिंग परिवर्तनाशी संबंधित तू किती गोष्टी जाणून होती?
- वाणी कपूर ः मी खूप गोष्टी वाचत असते. बातम्या पाहत असते. माझे कुटुंब पुरोगामी विचारसरणीचे आहे. त्यामुळे लिंगपरिवर्तनाबद्दल माहिती होती. पण ही भूमिका साकारताना अधिक जीवंतपणे साकारता यावी म्हणून मी अधिक डॉक्युमेंट्री पाहिल्या.
- प्रश्न ः चित्रपटात आयुष्मानला जिम ट्रेनरच्या भूमिकेत दाखवणे आवश्यक होते का?
- वाणी कपूर ः अभिषेकने आयुष्मानला जाणूनबुजून जिम ट्रेनरची भूमिका दिली. बरीच मुले आपल्या पौरुषत्वाचे प्रदर्शन करत असतात. मात्र आयुष्मानची चित्रपटातील भूमिका यापेक्षा कितीतरी वेगळी आहे. इगो बाजूला सोडून ट्रान्सजेंडर मुलीकरिता जे बदल स्वतःच्या विचार आणि आयुष्यात आयुष्मान आणतो ते बदल खरंतर सर्व लोकांत आले पाहिजेत.
- प्रश्न ः रणबीर कपूरसोबत ‘शमशेरा’ चित्रपटातही काम करत आहेस... हिरोईन बनण्याचे स्वप्न कधीपासून होते?
- वाणी कपूर ः मला आणि रणबीर आणि त्याचे कामही पसंत आहे. त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळणे माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. हिरोईन बनण्याचे स्वप्न मी ठेवले नव्हते. मला डॉक्टर व्हायचे होते. पण कॉलेजमध्ये असताना काहींनी मला सौंदर्य स्पर्धेत घेण्याबद्दल सूचवले. मी कॉलेजच्या सौंदर्य स्पर्धांत जिंकल्यानंतर मॉडेलिंग करण्याचा विचार डोक्यात आला. घरूनही सपोर्ट मिळाला आणि मी मॉडेलिंग आणि नंतर कलाक्षेत्रात आले.
- प्रश्न ः नवीन वर्षांपासून काय अपेक्षा आहेत?
- वाणी कपूर ः मला अपेक्षा आहे की चांगल्या दिग्ददर्शकांसोबत मी चांगल्या चित्रपटांत काम करावे. चांगल्या कथांचा मी हिस्सा बनावी. मी स्वप्नाळू असल्यामुळे सारखे स्वप्न पाहते आणि ते पूर्णत्वास उतरविण्यासाठी प्रयत्न करते.
(promotional content)