गरिबीमुळे शाळेत जाऊ न शकणाऱ्या मुलांसाठी सोनू सूद आला धावून...

 
बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत गरजूंना भरपूर मदत केली. त्याच्याकडे मदतीच्या अपेक्षेने गेलेल्या कुणालाही त्याने निराश केले नाही. सध्याही तो गरजूंना मदत करतोच आहे. पुन्हा मदतीसाठी तयार असल्याचे त्याने नुकतेच सांगितले होते. मात्र देव न करो कुणाला मदतीची गरज पडावी, असेही सोनू सूद म्हणाला होता. मात्र पुन्हा एकदा सोनू सूदकडे मदत मागणाऱ्यांचाही ओघ सुरू झाला आहे.

शाळेत शिकणाऱ्या गरजू मुलांना मदत करावी, अशी मागणी एका व्टिटर युझरने सोनू सुदकडे केली होती. त्यानंतर त्या व्टिटला उत्तर देत मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेत असल्याने सोनू सूदने सांगितलं होतं. याआधी एका युझरने दोन मुलांचा अभ्यास करतानाचा फोटो सोनू सुदला पाठविला होता.

त्याखाली "सोनू सूद तू देवापेक्षा कमी नाही. देवाशिवाय आम्ही फक्त तुझ्यावरच विश्वास ठेवू शकतो. या मुलांना पुढे शिकायचंय. पण आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचे वडील फी भरू शकत नाहीत. तू त्यांना मदत करावी अशी विनंती'.. असे लिहिले होते. यावर उत्तर देताना वडिलांना मुलांचं दफ्तर भरायला सांगा, असे सोनू सूदने म्हटले होते. त्यानंतर सोनुने या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी देखील  घेतली होती.