सोनाक्षी सिन्हाने निवडला घटस्‍फोटित जोडीदार!

 
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लवकरच अभिनेता सलमान खानची नातेवाइक होणार आहे. ती सलमानचा भाऊ सोहेल खान याच्या मेव्हण्याशी लग्न करणार आहे. सोहेलचा मेव्हणा बंटी सचदेवा याच्यासोबत सोनाक्षी गेल्या काही महिन्यांपासून रिलेशनशीपमध्ये आहे. आता दोघांनी लग्नाचा विचार केला आहे.
बंटीचा यापूर्वी घटस्फोट झालेला आहे. २०००९ मध्ये त्‍याने पहिलं लग्न केलं होतं. अंबिका चौहान असे त्‍याच्या पहिल्या पत्‍नीचे नाव आहे. ती गोव्याची आहे. या दोघांच्या लग्नात सलमानने सरप्राईज एंट्रीही केली होती. दोघांत घटस्‍फोट झाल्यानंतर काही महिन्यांपूर्वी सोनाक्षीची बंटीच्या आयुष्यात एंट्री झाली. दोघे काही दिवसांपासून एकत्र राहत आहेत. बंटीचे नाव यापूर्वी सुष्मिता सेन, दिया मिर्झा, नेहा धुपिया, समिरा रेड्डी या अभिनेत्रींसोबत सुद्धा जोडले होते. त्‍यानंतर आता सोनाक्षी सिन्हाच्या प्रेमात बंटी आहे. तो सेलिब्रिटी मॅनेजर आहे.