...म्‍हणून कांटा लगा गर्ल सिनेसृष्टीपासून गेली दूर!

 
मुंबई (मुंबई लाइव्ह वृत्तसेवा) ः कांटा लगा... हे गाणं आजही अनेकांच्या ओठावर येत असतं. या गाण्याने लोकप्रियतेचे शिखर गाठले होते. त्‍यावरून वादही झाले होते. गाण्यामुळे शेफाली जरीवाला रातोरात प्रसिद्ध झाली. २००२ मध्ये हे गाणे आले होते. मात्र एवढी प्रसिद्धी मिळूनही शेफाली अचानक गायब झाली होती. याचं कारण आता शेफालीने सांगितले असून, तिला फिट्‌स येण्याचा त्रास असल्याने सिनेसृष्टीत काम केले नाही, असा खुलासा तिने केला आहे.
शेफालीला वयाच्या १५ व्या वर्षी पहिल्यांदाच फिट्‌स आले. त्‍यावेळी तिच्यावर चांगला अभ्यास करण्याचे दडपण होते. अनेकदा तिला वर्गातही िफट्स यायचे. कधी कधी रस्त्याने चालतानाही हा त्रास होऊ लागला. कांटा लगा हे गाणे हिट होऊनही केवळ कधीही फिट्‌स येत असल्याने पुढे काम करायला हिंमत झाली नाही, असे शेफाली म्‍हणाली. आता शेफाली या आजारातून बरी झाली आहे. चिंता, नैराश्य आणि पॅनिक अटॅक सारख्या गोष्टींवर सहज मात केल्याचे समाधान तिला आहे. शेफालीने अनेक म्यूझिक व्हिडिओंमध्ये काम केले असून, नच बलिए ५ मध्ये देखील तिने सहभाग घेतला होता. बिग बॉस १३ मध्येही ती दिसली होती.