...म्हणून सैफ अली खान सोशल मीडियापासून चार हात लांब!
एका मुलाखतीत त्याने मनमोकळेपणाने संवाद साधला. जीवनाची वाटचाल कोणत्या दिशेने जातेय याचा विचार नव्या वर्षात विचार केला पाहिजे. जीवनात अडचणी येतात आणि जातातही. कोरोनाचा काळही तसाच निघून जाईल. सध्या तरी आपण आपल्या परिवाराची काळजी घेतली पाहिजे, असे सैफ म्हणाला. सोशल मीडियाबद्दल बोलताना तो म्हणाला, की एका दिवसात २४ तास असतात. ते कसे खर्च करायचे हा ज्याचा त्याचा निर्णय असतो.
मी जर सोशल मीडियावर असतो तर माझा बराच वेळ तिथे गेला असता. मला माझ्या मुला-बाळांसोबत वेळ घालवायचा असतो. पुस्तके वाचायची असतात. आणखी इतर कामांना सुद्धा वेळ द्यायचा असतो. सोशल मीडियावर कधीच येणार नाही असा कुठलाही निर्णय मी घेतलेला नाही. मात्र सोशल मीडियावरील एवढ्या अनोळखी लोकांजवळ माझे मत व्यक्त करणे आणि त्यातील काहींना वाईट वाटल्यावर ज्या कमेंट्स येतील त्यापासून दूर राहिलेले कधीही चांगले. नकारात्मक विचारांपासून दूर राहण्यासाठी मी सोशल मीडियापासून दूर राहतो, असे सैफ म्हणाला.