सैफ अन् राणीही तो सीन देताना अवघडले होते...
Nov 26, 2021, 00:55 IST
सैफ अली खान आणि राणी मुखर्जी पुन्हा एकदा एकत्र पडद्यावर दिसणार आहे. दोघांचा ‘बंटी और बबली २’ चित्रपट १९ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यापूर्वी या जोडीने ‘हम तुम’, ‘तारा रम पम’ आणि ‘थोडा प्यार थोडा मॅजिक’ या चित्रपटांत एकत्र काम केले होते. मात्र ‘हम तुम’मधील त्यांचा किसिंग सीन विशेष चर्चेत आला होता.
तो सीन केवळ प्रेक्षकांसाठीच नाही तर सैफ आणि राणीसाठीही अविस्मरणीय असाच आहे. कारण हा सीन देताना राणीला खूप अवघडले होते, तर सैफच्या दृष्टीने अतिशय वाईट किसिंग सीन होता. ‘बंटी और बबली २’ चित्रपटाच्या निमित्ताने यशराज फिल्मसने सैफ आणि राणीचा एक व्हिडिओ यु ट्यूब चॅनेलवर शेअर केला असून, यात दोघांतील संवाद मजेशीर आहे. राणी सैफला म्हणाली, की पहिल्यांदा किसिंग सीन देताना आपण किती घाबरलो होतो ना... त्यावर सैफ म्हणाला, तू घाबरली होतीफार... तुला किस करणे अनकन्फर्टेबल झाले होते, असे सैफ म्हणाला. दोघांनीही सांगितले, की किस करताना लाजत होतो. तो सीन अत्यंत अवघडल्यासारखा झाला होता.