पलक तिवारीचे बिकिनीत बोल्ड फोटोशूट; चाहते म्हणाले, आग लावलीस...

 
नवी दिल्ली : अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीही आईच्या पावलावर पाऊल ठेवत असल्याचे दिसून येत आहे. इन्‍स्टाग्रामवर सध्या तिने धुमाकूळ घातला आहे. नुकतेच तिने तिचे बिकिनी घातलेले बोल्ड फोटो शेअर केले आहेत. चाहत्यांनी या फोटोवर कमेंट आणि लाईकचा वर्षाव केला आहे. अनेकांनी हार्टचे इमोजी पोस्ट करून आग लावलीस... अशा कमेंट्‌स दिल्या आहेत.

नुकतीच पलक तिवारी हार्डी सिंधूच्या रिलीज झालेल्या बिजली बिजली या गाण्यावर थिरकताना दिसली होती. ते गाणे प्रचंड व्हायरल झाले होते. पलक तिवारी लवकरच काही नव्या चित्रपटांत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. ती सध्या विवेक ओबेरॉय सोबत काम करीत आहे. ती नेहमीच तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे.