नोराने सांगितला वाईट अनुभव, म्‍हणाली...

 
file photo

डान्‍सर, अभिनेत्री नोरा फतेही सत्यमेव जयते २ चित्रपटातील "कुसू कुसू...' या आयटम साँगमुळे सध्या चर्चेत आली आहे. या गाण्याच्या शूटिंगदरम्‍यान नोराला जीवघेणा अनुभव आल्याचे तिने नुकतेच पत्रकारांना सांगितले. सत्यमेव जयते २ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सत्यमेव जयतेप्रमाणेच भाग २ मध्येही जॉन अब्राहमच्या ॲक्‍शनचा तडका या चित्रपटात पहायला मिळेल.

चित्रपटातील आयटम साँग ‘कुसू कुसू’ प्रदर्शित होऊन काहीच दिवसांत गाजले आहे. यातील नोराचा डान्स पाहण्यासारखा आहे. मात्र तिने या गाण्याबद्दल केलेल्या खुलाशामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. तिने सांगितले, की गाण्याचे शूटिंग सुरू असताना यातील एका ड्रेसमुळे माझा श्वास गुदमरत होता. ओढणी गळ्याभोवती बांधलेली होती. त्यासोबत डोक्यावरील मुकुटाचे वजनही फार जास्त होते. ती ओढणी माझ्या गळ्याभोवती घट्ट बसली होती. त्यामुळे माझा श्वास गुदमरत होता. गळ्याला यामुळे जखमा झाल्या, असे नोरा म्‍हणाली. हा अनुभव माझ्यासाठी अत्‍यंत वाईट होता. असं वाटत होतं की माझी मान दोरीने बांधलेली आहे आणि जमिनीवर ओझत आहे. शूटिंगसाठी कमी वेळ असल्याने मी त्याही अवस्‍थेत गाण्याचे शूटिंग पूर्ण केले, असे ती म्‍हणाली. मिलाप झवेरी हे सत्यमेव जयते ३ चे दिग्दर्शन करत असून, अभिनेता मनोज बाजपेयीदेखील याही भागात दिसेल. दिव्या खोसला कुमार, अनुप सोनी, हर्ष छाया यांच्याही महत्त्वाच्या भूमिका चित्रपटात आहेत.