नेहा कक्करचा पती म्हणाला, बायकोची ही गोष्ट न ऐकल्यास खावा लागतो मार...

 
बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर कुठल्या ना कुठल्या कारणांनी नेहमीच चर्चेत असते. नेहा कक्करने गायलेले गाणे पार्ट्यांमध्ये वेगळाच माहौल करतात. नेहा कक्कर सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्ह असते. तिचा पती रोहनप्रित सिंह हासुद्धा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो.
दोघांची मस्ती आणि मनोरंनात्मक व्हिडिओ ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. जे प्रचंड व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ आता चर्चेत आला आहे.ज्यात रोहनप्रीत सिंह पत्नी नेहाची तक्रार करताना दिसतोय. सकाळी उशिरा उठल्यानंतर जेवणात काय मिळते, असा प्रश्न विचारल्यावर रोहनप्रीतने चप्पल असे उत्तर दिले. या व्हिडिओवर नेहाने कमेंट केली आहे. मी खुश आहे. आतापर्यंत चप्पल घेण्याची गरज पडली नाही, असे नेहाने कमेंटमध्ये लिहिले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. २०२० मध्ये नेहा कक्कडने पंजाबी सिंगर रोहनप्रीत सिंहसोबत लग्न केले होते. तेव्हापासून त्यांचे चाहते गुड न्यूजची वाट पाहत आहेत. गुड न्यूजबाबत अनेकदा अफवा सुद्धा पसरल्या होत्या. दोघांनी अनेक म्युझिक अल्बम मध्ये सोबत काम केले आहे. ज्यामध्ये ख्याल रखया कर व दो गल्ला हे म्युझिक व्हिडिओ प्रसिद्ध आहेत.