नागा चैतन्यने पहिल्यांदाच सोडले मौन... म्हणाला, "ती आनंदी असेल तर...'

 
बॉलिवूडची अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य हे त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामुळे सध्या चर्चेत आहेत. लोकप्रिय कपल अशी ओळख असलेल्या या जोडीने काही महिन्यांपूर्वी घटस्फोट घेतला. सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून दोघांनीही एकमेकांपासून वेगळे होत असल्याचं जाहीर केलं. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या अनेक चाहत्यांना धक्का बसला. घटस्फोट झाल्यानंतर समांथाने अनेकदा प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना या विषयावर भाष्य केलं. मात्र नागा चैतन्य यावर काहीच बोलला नव्हता. अखेर नागा चैतन्यने घटस्फोटावर मौन सोडून मनमोकळेपणाने संवाद साधला आहे.
नागा चैतन्यचा बंगा राजू हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होण्याच्या वाटेवर आहे. त्यामुळे सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. प्रमोशनदरम्यान पत्रकारांनी त्याला घटस्फोटाबद्दल  विचारले. त्यावर त्याने भाष्य केले. आमच्या भविष्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला होता. आमचे वेगळे होणे योग्यच होते. दोघांच्या वैयक्तिक आनंदासाठी आम्ही हा निर्णय घेतला. जर ती या निर्णयामुळे आनंदी असेल तर मीसुद्धा आनंदी आहे. अशा परिस्थितीत घटस्फोट हाच एकमेव योग्य निर्णय होता, असे नागा चैतन्य म्हणाला. दोघांचे २०१७ मध्ये लग्न झाले होते. २००९ मध्ये एका तेलगू चित्रपटाच्या सेटवर दोघांची भेट झाली होती. २०१५ मध्ये दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते, असे म्हटल जाते. मात्र लग्नानंतर चार वर्षांतच ते वेगळे झाले.