करिश्मा कपूरचा धक्कादायक खुलासा! म्हणाली, पती संजयने "त्या' रात्री...

 
file photo
मुंबई  ः बॉलिवूडमध्ये एकेकाळी करिश्मा कपूर म्हणजे बस नाम ही काफी हैं... अशा वेगळ्या उंचीपर्यंत पोहाेचली होती. एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट तिने बॉलिवूडला दिले आहेत. यामुळे ती आजही चाहत्यांच्या स्मरणात आहे. मात्र व्यावसायिक जीवनात यशस्वी झालेल्या करिश्माला तिच्या व्यक्तिगत आयुष्यात मात्र प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला.

अभिषेक बच्चनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तिने उद्योगपती संजय कपूरसोबत लग्न केलं. मात्र तिने सुखी संसाराची पाहिलेली स्वप्ने तिला सत्यात उतरवता आली नाहीत. करिश्मा ही संजय कपूरची दुसरी पत्नी होती. त्यांचा प्रेमविवाह होता. मात्र नंतरच्या काळात करिश्माने संजय कपूरवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले. करिश्माने तिच्या वैवाहिक जीवनाबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. संजयने तिला हनीमूनसाठी विकण्याचा प्रयत्न केला होता. मित्रांसोबत झोपायला सांगत होता.

करिश्माने नकार दिल्यावर संजयने तिला मारहाण देखील केली. याशिवाय तिच्यासोबत झोपण्यासाठी तिचा रेटसुद्धा एका मित्राला सांगितला, असा धक्कादायक खुलासा करिश्माने केला आहे. करिश्मासोबत लग्न केलेले असतानाही तो त्याच्या पहिल्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवत होता. जेव्हा करिश्माने याबाबत संजयला विचारणा केली तेव्हा संजयने तिला मारहाण केली. हा त्रास एवढा वाढला की अखेर करिश्माने हा संसार तोडण्याचा निर्णय घेतला. २०१२ मध्ये ती मुलांना घेऊन संजयपासून दूर राहू लागली. घटस्फोटासाठी तिने अर्ज केला आणि अखेर १३ वर्षांचा हा संसार तुटला. संजय कपूरपासून करिश्माला समायरा आणि कियान अशी दोन मुले असून, ती करिश्मासोबत राहतात.