कंगनाचा दाक्षिणात्य कलाकारांना सल्ला... म्हणाली, बॉलीवूडमध्ये येऊन भ्रष्ट होऊ नका!

 
बॉलिवूडची अभिनेत्री कंगना राणावत वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी गेल्या वर्षभरात कंगनाचे बिनसले होते. आताही ती तिच्या एका विधानामुळे चर्चेत आली आहे. पुष्पा चित्रपटावर तिने दिलेल्या प्रतिक्रियेमुळे तिची चर्चा होत आहे. बॉलीवूडचा दर्जा घसरत आहे. त्या तुलनेत दाक्षिणात्य चित्रपट गाजत आहेत, असे कंगना म्हणाली.
कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून हे मत व्यक्त केले आहे. यात तिने साऊथच्या पुष्पा आणि KGF 2 या चित्रपटांचे तोंडभरून कौतुक केले आहे. तिने या चित्रपटातील कलाकारांचेही कौतुक केले आहे. दाक्षिणात्य सिनेमे भारतीय सभ्यता आणि संस्कृतीशी जोडलेले आहेत. विशेष म्हणजे ते आपल्या कुटुंबावर फार प्रेम करतात. ते पारंपरिक आहेत. पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाखाली गेले नाहीत आणि ते आपल्या कामाप्रती एकनिष्ठ आहेत. त्यामुळेच दाक्षिणात्य सिनेमे सुपरहिट होत आहेत, असे कंगणा म्हणाली. दाक्षिणात्य सिनेमातील कलाकारांनी बॉलीवूडमुळे आपण भ्रष्ट होणार नाही याची काळजी घ्यावी, असा सल्लाही तिने दाक्षिणात्य कलाकारांना दिला आहे.