इशा गुप्ताचा धक्कादायक खुलासा... म्‍हणाली, त्‍या दोघांची भीती वाटत होती...

म्‍हणून मेकअप आर्टिस्टला सोबत घेऊन झोपायचे!
 
 
File Photo
मुंबई ः बॉलीवूडमध्ये कास्‍टिंग काऊचचा प्रकार नवा नाही. अनेक अभिनेत्रींना या किळसवाण्या प्रकाराला सामोरे जावे लागले आहे. ईशा गुप्तालाही दोन व्यक्‍तींकडून हा अनुभव आला. ज्‍या व्‍यक्‍तींकडून हे अनुभव आल्याचे तिने म्‍हटले आहे, त्‍यातील एकासोबत एका चित्रपटात तिने कामही केले आहे. हिच्याशी गप्पा वाढवू. नंतर हिच्या रूममध्ये जाऊ, असे त्यांना वाटले पण मी एकटी झोपायला घाबरते असे सांगून मेकअप आर्टिस्टला सोबत घेऊन रूममध्ये झोपायचे. मला भुताची भीती नव्हती. पण त्या दोघांची भीती वाटत होती, असा धक्कादायक खुलासा इशाने केला आहे.
पाच दिवस शूटिंग चालल्यानंतर एका निर्मात्याने मला चित्रपटातून काढून टाकले. त्‍याच्यासोबत शरीरसंबंध ठेवायला नकार दिल्यानेच त्‍याने मला काढून टाकले, असा आरोपही इशाने केला आहे. स्‍टारकिड्‌सना असे अनुभव येत नाहीत. कारण त्‍यांच्या पालकांना कळले तर काय घडेल याची कल्पना अशा लोकांना असते. पण बाहेरून येणाऱ्या नवोदित कलाकारांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न बॉलीवूडमध्ये होतो, असे इशा म्हणाली. जन्नत २ चित्रपटातून इशाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने राज ३ डी, रुस्तम, बादशाहो, कमांडो २ या हिंदी तर काही तमिळ आणि तेलगू चित्रपटांत काम केले आहे.