अभिनेत्री पूनम पांडेवर पतीचा जीवघेणा हल्ला!

 
POONAM PANDEY
मुंबई ः अभिनेत्री कमी अन्‌ मॉडेलच जास्त असलेल्या पूनम पांडेचा धिंगाणा सर्वश्रुत आहे. दारू पिऊन, कार रस्‍त्‍यावरच लावून धिंगाणा घालताना मागे पोलिसांनी तिच्यावर कारवाई केली होती. तिचा नवराही त्‍याच पट्टीतला निघाला आहे. तिचा पती सॅम बॉम्बे याला मुंबई पोलिसांनी अटक केली असून, त्‍याने पूनमला बेदम मारहाण केल्याची तक्रार आली आहे.
पूनमला सध्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पूनमच्या डोके, डोळे आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. पूनमवर पतीने हल्ला करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्‍याने अनेकदा तिचा शारीरिक छळ व मारहाण केली आहे. दोघांचे लग्न १० सप्टेंबर २०२० रोजी झाले होते. मागे गोव्यात पूनमने सॅमविरुद्ध तक्रार दिली होती. मला त्‍याच्यापासून वेगळे व्हायचे आहे, असेही पूनमने सांगितले होते. पण नंतर तिनेच निर्णय बदलला होता. लग्नापूर्वी पूनम आणि सॅम दीर्घकाळ लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होते. त्‍यानंतर दोघांनी लग्न केले होते.