सुष्मिता सेनची संपत्ती किती?

 
file photo
बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन लोकप्रिय अभिनेत्री आहे. गेल्या काही दिवसांत ती तिच्या वैयक्‍तीक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकताच तिचा आणि तिच्या बॉयफ्रेंड रोहमन शॉलचा ब्रेकअप झाला. मात्र हा ब्रेकअप काही तिच्यासाठी नवीन नाही. याबाबतीत ती खूपच अनुभवी (!) असून याआधी तिने तब्बल १० ब्रेकअप पचवले आहेत. एकेकाळी विश्वसुंदरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुष्मिताची संपत्ती किती असेल बरं...
सुष्मिताला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आयुष्य जगायला आवडते. मोठ्या पडद्यावर व ओटीटी प्लॅटफॉर्मवरसुद्धा सुष्मिताने वेगळीच छाप सोडली आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार सुष्मिता तब्बल ७० कोटींची मालकीन आहे. दरमहा ती ६० लाख रुपये कमावते. एका चित्रपटासाठी ती ३ ते ४ कोटी रुपये मानधन घेते. एका जाहिरातीसाठी तिचा दर दीड कोटी रुपयांचा असतो. १९९६ मध्ये तिने दस्तक या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. भारतासह विदेशातही तिचे भक्कम चाहते आहेत.