हॉट & बोल्ड उर्फी जावेद म्‍हणते, नवीन वर्ष मी बेडवर...

 
file photo
बिग बॉसमध्ये भाग घेतल्यानंतर चर्चेत आलेली उर्फी जावेद तिच्या चाहत्यांना आणि ट्रोलर्सना धक्के देण्यात मागे नाही. उर्फी तिच्या बोल्ड आणि उत्तेजक फोटोंमुळे चर्चेत असते. मात्र मंगळवारी तिने इन्स्टाग्रामवर अपलोड केलेला फोटो चाहत्यांसाठी आणि ट्रोलर्ससाठी सुद्धा धक्कादायक असाच आहे.

पिवळी साडी आणि स्लीव्हलेस ब्लाऊज घातलेला फोटो पाहून चाहते घायाळ झाले. तिच्या या फोटोवर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला. ट्रोलिंग कमेंटपेक्षा कौतुकाच्या कमेंट्स जास्त होत्या. उर्फीच्या त्या फोटोवर अनेकांनी हार्ट इमोजी टाकून प्रेम व्यक्त केले तर काहींनी आगीचे इमोजी टाकून फोटोमुळे इंटरनेटवर आग लागल्याचे सांगितले.

एका ट्रोलर्सने लिहिले की तू पहिल्यांदा सुंदर दिसत आहेस. चाहत्यांनी तिच्या केसांचे कौतुक केले. काहींनी यापेक्षा सुंदर काय असू शकते, अशा कमेंट्स केल्या. माझी तब्येत बरी नाही नवीन वर्ष मी बेडवर झोपून घालवणार आहे, असे कॅप्शन उर्फीने या फोटोला दिले आहे. काही चाहत्यांनी तिच्या आजारावर चिंता व्यक्त करून तिचा आजार बरा होण्यासाठी प्रार्थना करत असल्याचे लिहिले आहे.