हरनाज म्हणते, या अभिनेत्यासोबत करायची बॉलिवूड एंट्री!
Dec 23, 2021, 15:54 IST
वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी मिस युनिवर्सचा पुरस्कार मिळवणारी हरनाज सिंधू सध्या चर्चेत आहे. आतापर्यंत केवळ बोटावर मोजण्याइतक्याच अभिनेत्रींनाच मिस युनिवर्स होता आले आहे. तब्बल २१ वर्षांनंतर भारतीय मुलीला हा किताब मिळाल्याने सध्या देशभर हरनाज सिंधूच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे ती बॉलिवूडमध्ये कधी येणार याबद्दलही चर्चा सुरू झाली आहे.
शाहरुख खानवर हरनाज सिंधूचे प्रचंड प्रेम असून ती त्याचा खूप आदर करत असल्याचे बोलले जाते. शाहरुखसोबतच बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याची तिची इच्छा आहे. मुलाखतीत ती म्हणाली, की मला माहीत नाही की काय होईल. मी कधीही कोणत्याही गोष्टींचे प्लॅनिंग केले नाही. मात्र संधी मिळाली तर त्याचे सोने करण्याचा मी प्रयत्न करीन. संजय लीला भन्सालींसोबत काम करण्यासाठी इच्छुक आहे. त्यांची काम करण्याची शैली मला आवडते, असेही ती म्हणाली. शाहरुख खानचा मी सन्मान करते. तो नेहमीच जमिनीशी जुळलेला आहे. त्यामुळे त्याला यश मिळाल्याचे ती म्हणाली. शाहरुख एक अद्भूत कलाकार आणि अद्भूत व्यक्ती असल्याचे ती म्हणाली.