स्वराला नाही करायचे लग्न! आई बनण्यासाठी "या' पद्धतीचा करणार उपयोग!!

 
file photo
अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या बोल्ड आणि बिनधास्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. ती सध्या तिच्या एका निर्णयामुळे चर्चेत आली आहे. सिंगल मदर म्हणजेच लग्न न करता आई होण्याचा निर्णय तिने घेतला आहे. ती एका बाळाला दत्तक घेणार असून, त्याच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारणार आहे. बाळाला दत्तक घेण्याची प्रक्रिया तिने सुरू केली आहे.
स्वराने सिंगल मदर याविषयावर यापूर्वी एका मुलाखतीत भाष्य केले होते. लग्न कधी करणार, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ती म्हणाली होती, की ज्याच्यावर माझं प्रेम नाही अशा व्यक्तीशी लग्न करून मला संसार थाटण्यात इंटरेस्ट नाही. मुलांच्या भविष्यासाठी त्यांना आदर्श आई- वडिलांची आवश्यकता असते. मात्र त्यांचे आपसात प्रेम असेल तरच ते आदर्श होऊ शकतात. अनेक मुलांना तुटलेल्या कुटुंबात मोठं व्हावं लागतं. यापेक्षा सिंगल मदर बनून चांगल्या वातावरणात मुलांना मोठं करणं कधीही चांगलं, असं स्वरा म्हणाली होती. बाळ दत्तक घेऊन मी माझे स्वप्न पूर्ण करू शकते. मी नशीबवान आहे. भारतात केवळ महिलांसुद्धा मुलं दत्तक घेण्याची परवानगी आहे, असे स्वरा म्हणाली.