दिव्या खोसला बनली राजकारणी!

 
divya khosala

सत्यमेव जयते २ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. यात जॉन अब्राहम आणि दिव्या खोसला कुमार मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या दोघेही बिझी आहेत. या चित्रपटात दिव्याने चक्‍क राजकारणी महिलेची भूमिका साकारली आहे. तिने एक सक्षम आणि सशक्‍त महिला राजकारण भूमिकेतून उभी केली. मात्र यासाठी तिला खूप मेहनत घ्यावी लागली.
 

आंधी, गुलाब गँग आणि राजनिती सारख्या चित्रपटांचा अभ्यास तिने केला. २००४ मध्ये आलेल्या ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियों’ या चिपटातून दिव्याने आपल्या बॉलीवूड करिअरला सुरुवात केली होती. ती टी-सीरीजचे प्रमुख भूषण कुमार यांची पत्‍नी असून, तिला एक मुलगाही आहे.२०१४ मध्ये तिने यारियां आणि त्‍यांनतर ‘सनम रे’ या चित्रपटाचे दिग्ददर्शनही केले होते. मॅडम चीफ मिनिस्टरमध्ये रिचा चढ्ढा, थलायवीमध्ये कंगना राणावत आणि आंधीमध्ये सुचित्रा सेन यांनी राजकारणी महिलांच्या भूमिका सक्षमपणे साकारल्या आहेत. त्‍यामुळे दिव्यापुढेही या भूमिकेचे आव्हान होते. ते तिने मोठ्या मेहनतीने चांगल्या प्रकारे सांगितले, असे सांगितले जात आहे.