ती गोष्ट मलायका करत नव्हती म्हणून घटस्फोट!

अरबाजचा आरोप
 
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अरबाज खान वेगळे होऊन इतकी वर्षे झालीत, पण अजूनही दोघांचा घटस्फोट का झाला, याची चर्चा काही केल्या थांबत नाही. यावर आता अरबाजने जे कारण सांगितले तेही चकीत करणार आहे.
मलायका तिची चूक कधीच मान्य करत नव्हती. तिला तिची चूक सांगणेच चुकीचे होते. तिला ऐकूनच घेत नव्हती. वाद घालत होती आणि तिच्या चुकांचेही खापर माझ्यावर फोडत होती, असे अरबाजने म्हटले अाहे. यापूर्वी मलायकाने अरबाजवर आरोप केले होते. अरबाज बेजबाबदार आहे. तो घरातल्या वस्तू जागेवर न ठेवता कुठेही ठेवतो. याचा तिला त्रास होतो, असा आरोप तिने केला होता. इतकी क्षुल्लक कारणं आहेत दोघांची की चाहत्यांनाही हसू यावं. संसार म्हटला की भांड्याला भांडं लागणारच. पण तो तोडायचा म्हटलं की छोटंसं कारणही पुरेसं ठरतं, असंच या दोघांच्या वर्तनावरून आणि निर्णयावरून दिसून येत आहे. संसार तुटल्याचं दुःखही घटस्फोटानंतर दोघांच्या चेहऱ्यावर दिसून आलं नव्हतं. कारण अरबाज जॉर्जिया एंड्रियानी हिच्यासोबत लगेच रिलेशनशिपमध्ये गेला तर मलायका तिच्यापेक्षा वयाने कितीतरी कमी असलेल्या अर्जुन कपूरसोबत फिरताना दिसू लागली. बॉलीवूडमध्ये कोणतंही नातं टिकणं जरा अवघडच असतं. मोहमायाच्या चक्करमध्ये नातं त्यांच्यासाठी काहीही महत्त्व करत नाही.