चिरंजीवीची मुलगी श्रीजा घटस्फोट घेणार?
Jan 19, 2022, 13:51 IST
दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा सुपरस्टार चिरंजीवीच्या घरातून घटस्फोटाची बातमी समोर येत आहे. चिरंजीवीची सर्वात लहान मुलगी श्रीजा हिने सोशल मीडिया साइटवरून तिच्या पतीचे नाव हटवल्याने घटस्फोटाची चर्चा सुरू झाली आहे.
श्रीजाने पती कल्याणचे नाव हटवून वडिलांचे आडनाव इन्स्टाग्राम खात्यावर दिले आहे. तेव्हापासून आणखी एक संसार तुटणार असल्याचा अंदाज टॉलिवूडमध्ये लावला जात आहे. कल्याण आणि श्रीजाचे लग्न मार्च २०१६ मध्ये झाले होते. २०१८ मध्ये त्यांनी एका मुलीला जन्म दिला होता. श्रीजाचे कल्याणसोबत दुसरे लग्न होते. याआधी ती शिरीष भारद्वाजची पत्नी होती. २०११ मध्ये तिने शिरीषवर शोषणाचा आरोप केला होता. त्यानंतर दोघे वेगळे झाले होते. आता पुन्हा एकदा श्रीजाने तिच्या इन्स्टाग्राम खात्याचे नाव श्रीजा कल्याण वरून श्रीजा कोनिडेला असे केले आहे. त्यामुळे चिरंजीवीच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे.