शिल्पा शेट्टीला दिलासा! हॉलिवूड कलाकाराने केले होते किस; अश्लीलता पसरवल्याचा होता आरोप
Updated: Jan 30, 2022, 10:40 IST
अश्लीलता पसरविल्याच्या कारणावरून २००७ मध्ये शिल्पा शेट्टी आणि हॉलिवूड कलाकार रिचर्ड गेरे यांच्याविरुद्ध उत्तरप्रदेश आणि राजस्थानमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.दरम्यान १४ वर्षांनंतर या प्रकरणी शिल्पा शेट्टीला दिलासा मिळाला असून, महानगर न्यायाधीश केतकी चव्हाण यांनी शिल्पा शेट्टी निर्दोष असल्याचा निर्वाळा दिला आहे. इंग्रजी वेबसाईट इंडिया टुडेने याबाबतचे वृत्त दिले आहे.
२००७ मध्ये एका कार्यक्रमात रिचर्ड गेरे याने शिल्पाचे उघडपणे सर्वांसमोर चुंबन घेतले होते. त्यानंतर अश्लीलता पसरविण्याचा आरोप करून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान १४ वर्षांनंतर न्यायालयाने शिल्पा निर्दोष असल्याचे म्हटले आहे. शिल्पा आरोपी नाही. ते कृत्य रिचर्डचे होते. शिल्पाच्या विरोधातील आरोप निराधार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तक्रारीवरून शिल्पा अपराधी आहे हे सिद्ध होत नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. मुंबईतील बैलार्ड पियर न्यायालयाने हा निकाल दिला.