भाऊ कदम आणि कुशलचा पांडू रविवारी टिव्हीवर
Updated: Jan 29, 2022, 18:02 IST
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला पांडू हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. भाऊ कदम, कुशल बद्रिके, सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळी, प्रविण तरडे, आनंद इंगळे यांच्यासारखे कसलेले कलाकार असल्याने चित्रपटाला थिएटरमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. आता हाच चित्रपट लवकरच टिव्हीवर सुद्धा पहायला मिळणार आहे. त्यामुळे चाहते आनंदी आहेत.
३० जानेवारीला संध्याकाळी ७ वाजता झी मराठी या वाहिनीवर पांडू चित्रपट पहायला मिळणार आहे. याबद्दल बोलताना भाऊ कदम म्हणाला, की सध्याच्या तणावाच्या परिस्थितीत लोकांना मनोरंजनाचे दोन क्षण देऊन हसवणे यासारखे पुण्याचे काम नाही. पांडू सिनेमा प्रेक्षकांची ही गरज शंभर टक्के पूर्ण करेल, असा विश्वास आहे. रविवारी संध्याकाळी अख्ख्या परिवारासोबत टेन्शन फ्री होऊन चित्रपटाचा आस्वाद घ्यावा, असे भाऊ म्हणाला तर कुशल बद्रिके म्हणाला, की हा चित्रपट प्रेक्षकांना नुसते हसवणार नाही तर नवी ऊर्जा देईल असा मला व आमच्या टीमला विश्वास आहे, असेही तो म्हणाला.