अंकिता लोखंडेचा पती आहे कोट्यधीश! करताे हा व्यवसाय!!

 
file photo
बॉलिवूडची अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि उद्योगपती विकी जैन १४ डिसेंबर रोजी लग्नाच्या बंधनात अडकले. दोघांचा शाही विवाह सोहळा मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी त्यांनी करोडो रुपये खर्च केले. एवढे करोडो रुपये खर्च करणारा अंकिताचा पती विकी जैन आहे तरी कोण? तो करतो काय, असे प्रश्न अंकिताच्या चाहत्यांना पडले आहेत.
विकी जैन याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने एमबीएसुद्धा केलं. नंतर तो त्याच्या कुटुंबीयांचा व्यवसाय सांभाळत आहे. बिलासपूर येथील महावीर इन्स्पायर ग्रुपचा तो व्यवस्थापकीय संचालक आहे. या ग्रुपचा रियल इस्टेट, डायमंड, कोळसा व्यापार आहे. महावीर बिल्डर्स अँड प्रमोटर्स असं विकीच्या रियल इस्‍टेट कंपनीचं नाव आहे. याशिवाय बिलासपूरमध्ये जैन कुटुंबियांचं फर्निचरचं मोठं शोरूमसुद्धा आहे. विकी हा क्रीडाप्रेमी आहे. त्यामुळे त्याने क्रीडा क्षेत्रातही मोठी गुंतवणूक केली आहे. बॉक्स क्रिकेट लीगमध्ये मुंबई टायगर्स या टीम चा तो सहमालक आहे.