अक्षय करिनाला म्हणाला होता...यानंतर तुझ्यासोबत काम नाही!

 
बॉलिवूडचा सुपरस्टार आणि खतरों का खिलाडी म्हणून प्रसिद्ध असलेला अक्षय कुमार एक लोकप्रिय अभिनेता आहे. बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चित्रपट त्याच्या नावावर आहेत. अभिनय आणि या वयातही फिटनेसमुळे तो नेहमीच चर्चेत असतो. अतरंगी रे हा त्याचा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. जो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. अक्षयने आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत काम केले आहे. मात्र एका अभिनेत्रीसोबत काम करण्यासाठी त्याने चक्क नकार दिला होता.
त्याचे झाले असे, की अक्षयने एकदा कॉमेडीयन कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली. त्याच्यासोबत अभिनेत्री करिना कपूरसुद्धा होती. त्या शोमध्येच यापुढे तुझ्यासोबत काम करणार नाही, असे अक्षय करिनाला म्हणाला होता. मात्र हे काही त्याने मनातून म्हटले नव्हते. कॉमेडी शोमधला हा एक जोकच होता. दोघे या शोमध्ये त्यांच्या गुड न्यूज या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते. शोमध्ये करिनाने कपिल शर्मा आणि कियारा अडवाणीला आजूबाजूला बसवले होते, तर अक्षय दूर बसला होता. त्यानंतर करिनाची मस्करी करत आता तू कपिल शर्मा सोबतच काम कर. हा तुझा आणि माझी शेवटचा चित्रपट, असे अक्षयने म्हटले होते. त्यामुळे एकच हास्यकल्लोळ उडाला होता.