अभिनेत्री उर्फी जावेद म्हणते, मुस्लिम तरुणाशी लग्न करणार नाही; "हे' सांगितले कारण

 
file photo
उर्फी जावेद नेहमीच चर्चेत राहते. कपडे घालण्याच्या तिच्या शैलीमुळे, बोल्ड फोटोशूटमुळे अनेकदा तिला अनेकदा ट्रोल व्हावे लागले आहे. अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करूनसुद्धा ती चर्चेत राहते.
सध्या तिने केलेले एक विधान चर्चेत आहे. मी कधीही मुस्लिम मुलाशी लग्न करणार नाही. माझ्या सोशल मीडियावरील पोस्ट व फोटोंवर सर्वाधिक घाणेरड्या कमेंट मुस्लिम लोक करतात, असे विधान उर्फीने केले आहे. इंडिया टुडे डॉट इन या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत तिने हे विधान केले आहे. मी मुस्लिम धर्माची प्रतिमा मलिन करत असल्याचे त्या लोकांना वाटते. त्यामुळे ते माझ्याशी नफरत करतात. मुस्लिम पुरुषांना वाटते की महिलांना नियंत्रित ठेवावे. त्यामुळे मी इस्लामला मानत नाही, असेही उर्फी म्हणाली. धर्माला मानण्यासाठी जबरदस्ती करू नये. प्रत्येकाला ज्याचे त्याचे धार्मिक स्वातंत्र्य आहे, असेही उर्फी म्हणाली.