४७ वर्षांची उर्मिला अद्याप का नाही झाली आई?
मातृत्वाबद्दल तुमचे काय मत आहे? आई होण्याचा तुम्ही विचार करत आहात का? किंवा मूल दत्तक घेण्याचा विचार आहे का? असा प्रश्न उर्मिला यांना विचारण्यात आला तेव्हा त्या म्हणाल्या, याचा मी फारसा विचार करीत नाही. जेव्हा जे व्हायचे ते होईल, असे उर्मिला मातोंडकर म्हणाल्या. प्रत्येक स्त्रीने आई असणे आवश्यकच आहे असे नाही. योग्य कारणांसाठी मातृत्व हवे. मला मुलं आवडतात पण जगात अशी अनेक मुलं आहेत, ज्यांना प्रेमाची गरज आहे, असे उर्मिला म्हणाल्या.
सिनेसृष्टीला अलविदा करण्याबद्दल उर्मिला यांना विचारण्यात आले तेव्हा त्या म्हणाल्या की, मी अभिनय कारकिर्दीचा त्याग केला नाही. आयुष्यात अनेक टप्पे येतात आणि जातात आणि या सर्व टप्प्यांवर माझा विश्वास आहे. लग्न झाल्यावर मला लग्नाचा आनंद घ्यायचा होता. आयुष्य एका ट्रॅकवर चालवणे मला आवडत नाही. आयुष्याची अनेक रूपे असायला हवीत. मला सर्व काही मोकळेपणाने जगायचे आहे. चित्रपट हा माझ्या आयुष्यातला सर्वोत्तम भाग आहे. पण तेवढ्यापुरते माझे आयुष्य नाही. एखादा नवा प्रकल्प माझ्याकडे आला आणि तो करावासा वाटला तर तो मी नक्कीच स्वीकारेल, असेही उर्मिला म्हणाल्या.