काय सांगता? सलमाननं सोनाक्षीसोबत लग्न केलं...
Feb 28, 2022, 14:22 IST
२७ डिसेंबर १९६५ ला जन्मलेला सलमान आता ५६ वर्षांचा झाला आहे. पण त्याने अद्याप लग्नाचा निर्णय घेतलेला नाही. आजवर त्याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. ऐश्वर्या रायपासून कॅटरिना कैफपर्यंत त्याच्या प्रेमसंबंधाची चर्चा झाली. पण या चर्चा काही लग्नापर्यंत पोहोचल्याच नाही. ऐश्वर्याशी ब्रेकअप झाल्यानंतर बहुतेक त्याने लग्नाचा विचारच सोडून दिल्याचे दिसून येत आहे. असे असताना दोन दिवसांपूर्वी काही फोटोंनी त्याच्या चाहत्यांची झोप उडवली होती. सलमानभाईने अभिनेत्री सोनाक्षीसोबत लग्न केल्याचे हे फोटो होते.
चाहत्यांना न कळवता त्याने दुबईत गुपचूप लग्न केल्याची चर्चा यामुळे सुरू झाली. पण ही चर्चा काही तास टिकली. कारण नंतर लग्नाच्या फोटोंचे सत्यही समोर आले. सोनाक्षीला बॉलिवूडमध्ये आणण्यात सलमानची मोठी भूमिका आहे. जे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, ते एडिट केलेले होते, असे नंतर समोर आले. सलमान खान आणि सोनाक्षी सध्या दुबईत एकत्र असले तरी ते दबंग द टूर रिलोटेड या इव्हेंटसाठी एकत्र आहेत. त्यामुळे लग्नाची केवळ अफवा आहे. त्याच्या काही उतावीळ चाहत्यांनीच हे फोटो एडिट करून व्हायरल केल्याचे बोलले जात आहे.