ज्याच्यामुळे करिअरच्या शिखरावर पोहोचली उर्मिला, त्याच्यामुळेच झाले करिअर उध्वस्त! कोण होता तो?
उर्मिलाने बाल कलाकार म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली. मासूम या शेखर कपूर यांच्या सिनेमातील अभिनयामुळे ती खूप चर्चेत आली. तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या व्यक्तिगत आयुष्यामुळे उर्मिलाची जास्तच चर्चा झाली. उर्मिलाच्या अनेक अफेअरची चर्चा झाली. पण एका व्यक्तीमुळे ऊर्मिला आयुष्यच उद्ध्वस्त झालं. राम गोपाल वर्मा यांनी रंगीला या चित्रपटात उर्मिलाला संधी दिली. तिने संधीचे सोने केले.
रंगीलाच्या यशानंतर उर्मिलाला रंगीला गर्ल म्हणून ओळखलं जायचं. रंगीलाच्या यशानंतर उर्मिलाने मागे वळून कधीच बघितले नाही. तेव्हापासून राम गोपाल वर्माच्या प्रत्येक चित्रपटात उर्मिला दिसायची. राम गोपाल वर्मा आणि उर्मिला मातोंडकर यांनी कधीही त्यांच्या अफेअरचा स्वीकार केला नाही. मात्र रामगोपालमुळे उर्मिला तिच्या करिअरच्या शिखरावर पोहोचली आणि तिचे करिअरही राम गोपाल वर्मामुळेच उद्ध्वस्त झाले.
दोघांनी १३ चित्रपटांत सोबत काम केले. राम गोपाल वर्मासोबत काम करीत असल्याने इतर दिग्दर्शकांनी तिच्यासोबत काम करायला नकार दिला. कारण राम गोपाल वर्माचा अनेकांशी वाद होता. त्यामुळे त्याचं कुणाशीच पटत नव्हतं. त्यामुळे उर्मिलाला काम मिळणं कठीण झालं अन् एकप्रकारे तीच करिअरही रामगोपालमुळेच उद्ध्वस्त झालं.