एरिकाला जाड दिसण्यासाठी करावे लागत होते हे काम; म्हणाली मी कामूक दिसावी यासाठी....
माझ्या शरीरामुळे मला अनेकदा अपमानित केले जात होते, असे तिने मुलाखतीत सांगितले. एरिकाचा शेवटचा दाक्षिणात्य चित्रपट २०१७ मध्ये रिलीज झाला होता. मुलाखतीत तिने सांगितले, की मी तेव्हा खूप बारीक होते. साऊथ चित्रपटाला जशी आवश्यकता होती तशी मी नव्हते, असे चित्रपटाच्या दिग्दर्शकांना वाटत नव्हते. त्यांना चित्रपटात कामुक आणि मादक दिसणे अपेक्षित होते. त्यामुळे जाड दिसण्यासाठी कपड्यांच्या आत मला पॅड घालावे लागत होते.
मांड्यावर थाय पॅडपासून तर शरीरावर खुप सारे पॅड बांधावे लागत होते. मी जशी आहे तशी स्वीकारली गेली नाही. शरीराच्या प्रत्येक जागेवर पॅड बांधावे लागले, असे ती म्हणाली. त्यामुळे खूप अपमानित झाल्यासारखे वाटत होते. मात्र आता लोक आता पुढारलेले आहेत. त्यामुळे मी आता आनंदी आहे, असे ती म्हणाली. दरम्यान एरिका फर्नांडिसने २०१६ मध्ये टीव्ही क्षेत्रात पाऊल ठेवले. कुछ रंग प्यार के ऐसे भी... या मालिकेत तिने सोनाक्षी बोसची भूमिका साकारली. त्यामुळे तिला वेगळी ओळख मिळाली. कसोटी जिंदगी की या मालिकेतील भूमिकेने सुद्धा तिने चाहत्यांची मने जिंकली.