शंतनूसोबतच्या नात्यावर श्रुती हसन स्पष्टच बोलली... म्हणाली, आमचे विचार जुळतात, त्याच्यासोबत वेळ घालवायला आवडते!

 
अभिनेत्री श्रुती हसन सध्या दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवीसोबत आगामी काळात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटासाठी श्रुतीने मोठे मानधन घेतले आहे. याशिवाय श्रुती प्रशांत नीलच्या सालारमध्ये प्रभाससोबत दिसणार आहे. दरम्यान नुकतीच तिने एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत शंतनु हजारिकासोबतच्या नात्यावर स्पष्टपणे उत्तरे दिली. माझे आणि त्याचे विचार जुळतात. त्याच्यासोबत वेळ घालवायला मला आवडते, असे श्रुती हसन म्हणाली.

6788

शंतनु माझा अतिशय जवळचा मित्र आहे. तो अतिशय प्रतिभावान कलाकार आहे. कला, संगीत, सिनेमा या सर्वच बाबतीत माझे विचार त्याच्या विचारांशी जुळतात. त्यामुळे त्याच्यासोबत वेळ घालवायला मला आवडते. त्याच्याबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे, असे ती म्हणाली. लग्नाचे सध्या कोणतेही नियोजन नाही, असेही ती म्हणाली. मिथुनदा सोबत काम करायला आवडते.

माझ्या वडिलांसारखेच मिथुन दा यांना सुद्धा गोष्टी सांगायला खूप आवडतात आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी मला आवडतात, असे श्रुती म्हणाली. मिथुनदा सोबत काम करायला मिळाल्यामुळे मी स्वतःला खूप नशीबवान समजते, असेही श्रुती म्हणाली. श्रुती तिच्या वडिलांबद्दल बोलताना म्हणाली, की माझे वडील अतिशय संवेदनशील कलाकार आहे. त्यामुळेच ते त्यांची प्रतिक्रिया कठोर शब्दांत व्यक्त करत नाहीत. माझ्या चित्रपटांबद्दल त्यांना काय वाटते हे माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते, असेही ती म्हणाली.