शाहरुखच्या मुलीने निवडला जोडीदार? बॉलिवूडच्या या घराण्याची सून होणार??
शाहरुख खानची मुलगी सुहाना एका मुलासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा रंगली आहे. त्याचे कारण म्हणजे सुहानाचे एका स्टार कीडसोबत फोटो व्हायरल होत आहेत. बॉलीवूड स्टार चंकी पांडेच्या घरात सुहाना सून म्हणून जाणार असल्याची चर्चा आहे. शाहरुख स्वतः लग्नाचा प्रस्ताव घेऊन चंकी पांडे यांच्या घरी जाणार असल्याचेही वृत्त एका वेबसाईट ने दिले आहे.
शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. त्यामुळे सध्या प्रत्येक जण तिच्या बद्दल बोलत आहे. सुहाना सध्या अहान पांडे याला डेट करत आहे. अहान पांडे हा अभिनेत्री अनन्या पांडेचा भाऊ आहे. सुहाना खान आणि अहान पांडे खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघेही अनेकदा एकत्र दिसले आहेत. त्यामुळे दोघांचे फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत. त्यामुळे दोघांच्या रिलेशनशिपची जोरदार चर्चा रंगली आहे. असे असले तरी अद्याप त्यांच्याकडून या नात्याबद्दल कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही.