८० अभिनेत्रींचे लैंगिक शोषण करणाऱ्याशी सलमानची तुलना!; ती अभिनेत्री म्‍हणे, तुझा पर्दाफाश होईल!!

 
मुंबई : पाकिस्तानी अभिनेत्री  सोमी अली सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिने सोशल मीडियावरून नाव न घेता पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेता सलमान खानवर गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे सलमानवर आरोप करणारी पोस्ट तिने ऐश्वर्या राय- बच्चनला सुद्धा टॅग केली आहे. ८० पेक्षा जास्त अभिनेत्रींनी ज्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले त्या हॉलीवूड दिग्दर्शक हार्वी वाइनस्टिनशी तिने सलमानची तुलना केली आहे. अशाचप्रकारे बॉलिवूडचा सुद्धा पर्दाफाश होईल, असे सोमी अलीने तिच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. तिच्या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

पाकिस्तानी अभिनेत्री असलेल्या सोमीने वयाच्या सोळाव्या वर्षी मैने प्यार किया हा चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर ती सलमानच्या प्रेमात पडली. सलमानशी लग्न करण्याचे तिचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी ती पाकिस्तानातून भारतात आली. मात्र जेव्हा ती भारतात आली तेव्हा सलमान हा संगीता बिजलानीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरू होत्या. मात्र सोमी अलीने सलमानच्या आयुष्यात एंट्री केली आणि त्याचे संगीता बिजलानीसोबत ब्रेकअप झाले. सलमान आणि सोमी अली जवळपास ८ वर्षे एकमेकांच्या प्रेमात होते.

मात्र त्यानंतर ऐश्वर्या रायच्या नादी लागल्यानंतर सलमानने सोमी अलीला सोडून दिले. सलमान खानशी लग्न करण्याचे स्वप्न भंग झाल्याने ती फ्लोरिडा येथे गेली. तिथे तिने शिक्षण पूर्ण केले आणि तिथेच स्थायिक झाली. गेल्या २० वर्षांत सलमान खानशी संपर्क झाला नसल्याचे तिने नुकतच एका मुलाखतीत सांगितले होते. सलमानने विश्वासघात केल्याचे ती म्हणाली होती. सोमी अलीसाठी सलमानने संगीता बिजलानीला  सोडलं. मात्र त्यानंतर ऐश्वर्यासाठी त्याने सोमी अलीला सुद्धा सोडले आणि सोमी अलीचा विश्वासघात केला, अशी चर्चा बॉलिवूड इंडस्ट्रीत आजही होत असते.