पुढच्या वर्षी ईदला रिलीज होणार सलमान खानचा "कभी ईद कभी दिवाली'

 
नवी दिल्ली : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान हा त्याच्या चित्रपटाच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत असतो. त्याचे चित्रपट रिलीज होण्याची चाहत्यांना प्रतीक्षा असते. दरम्यान सलमानच्या कभी ईद कभी दिवाली या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा झाली आहे. पुढील वर्षी ईदच्या दिवशी हा चित्रपट रिलीज होणार आहे.
साजिद नाडियाडवाला आणि सलमान खानचा कभी ईद कभी दिवाली २०२३ च्या ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तरण आदर्शने व्टिट करून ही माहिती दिली आहे. मात्र चित्रपटाच्या निर्मात्यांनी अजून यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. २०२१ च्या ईदला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोनामुळे चित्रपटाचे शूटिंग थांबविण्यात आले होते. या चित्रपटात सलमान खानसोबत अभिनेत्री पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय दाक्षिणात्य अभिनेता वेंकटेशसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत या सिनेमात दिसणार आहे.