रणबीर-आलिया एप्रिलमध्ये करू शकतात लग्न!
दोघांच्या लग्नाबाबत विविध प्रकारच्या बातम्या समोर आल्या आहेत. मात्र नंतर त्या सर्व बातम्या निव्वळ अफवा ठरल्या. अशा परिस्थितीत आता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाबाबत आणखी एक नवीन अपडेट समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणबीर आणि आलिया यावर्षी एप्रिलमध्ये लग्न करणार आहेत. इतकंच नाही तर कपूर आणि भट्ट कुटुंबानंही या जोडप्याच्या लग्नाची तयारी सुरू केली आहे. रणबीर आणि आलिया राजस्थानच्या रणथंबोरमध्ये लग्न करू शकतात, असा दावाही करण्यात आला आहे.
हे कपल अनेकदा येथे सुट्टी घालवताना दिसत आहे आणि हे दोघांचे आवडते ठिकाण देखील आहे. यापूर्वी बॉलीवूडचे प्रसिद्ध स्टार जोडपे विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनीही लग्नासाठी रणथंबोरची निवड केली होती. एका वेबसाइटशी बोलताना भट्ट कुटुंबातील एका जवळच्या मित्राने लग्नाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आधीच्या मित्रांनी रणबीर आणि आलियाच्या लग्नाबद्दल बोलण्यास नकार दिला होता.
मात्र, आता वेबसाईटशी बोलताना त्यांनी या सर्व बातम्या खऱ्या असल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे रणबीर आणि आलिया याआधी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लग्न करणार होते. मात्र, त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांचे लग्न पुढे ढकलण्यात आले. अशा परिस्थितीत लवकरच चाहत्यांना रणबीर आणि आलियाच्या लग्नाची आनंदाची बातमी देखील ऐकायला मिळू शकते.