राखी सावंतने तीन वर्षांच्या संसारानंतर (!) घेतला घटस्फोट!
Feb 14, 2022, 12:56 IST
मुंबई ः राखी सावंतचं काय खरं अन् काय खोटं असतं हे अजिबात लक्षात येत नाही. आता तिने तीन वर्षे संसार करत असलेल्या पती रितेशपासून वेगळे होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आधी तर तिने पतीच लपवून ठेवला होता. बिग बॉस १५ मध्ये तिचा पती रितेश असल्याचे समोर आले आणि हा शो संपल्यानंतर आता काही दिवसांतच तिने पतीला सोडचिठ्ठी देत असल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली आहे.
इन्स्टाग्राम अकाउंटवर तिने याबाबत पोस्ट शेअर केली आहे. आमच्यातील समस्या संपवण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला यश आले नाही. त्यामुळे वेगळे होत आहोत, असे तिने म्हटले आहे. व्हॅलेंटाइन वीकमध्येच हे सर्व घडलं त्यामुळे खूप दुःखी असल्याचेही तिने म्हटले आहे. मला आता कामावर फोकस करायचे असून, आनंदी अन् निरोगी राहायचंय. दरम्यान, राखीसोबत लग्न केलेला रितेश आधीपासून विवाहित होता. त्यामुळे दोघे केवळ बिग बॉस १५ शोसाठीच एकत्र आले असावेत, अशी टीका तिच्या चाहत्यांनी केली आहे.