"पुष्पा'चा मोठा निर्णय, म्हणाला तशा चित्रपटांमध्ये काम करणार नाही...
Feb 1, 2022, 15:50 IST
पुष्पा म्हणजेच अल्लू अर्जुन सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. त्याच्या पुष्पा या चित्रपटामुळे विविध भाषिक प्रेक्षकांची मने त्याने जिंकली आहेत. अगदी देशविदेशातील स्टार्सने सुद्धा अल्लूचे कौतुक केले आहे. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरसुद्धा अल्लूचा मोठा फॅन झाला आहे. त्याने समाजातही मानाचं स्थान मिळवलं आहे. याच कारणामुळे अल्लूने चित्रपटांच्या बाबतीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. नुकतेच एका मुलाखतीत बोलताना त्याने याविषयी भाष्य केले...
अल्लू म्हणाला, की चाहत्यांशी असणारं माझं नातं हे महत्त्वाचं आहे. मला त्यांची काळजी घ्यावी लागते. प्रेक्षकांकडे मी एक जबाबदारी म्हणून पाहतो. हे एक देवाणघेवाण होण्याचं नात आहे, असे तो म्हणाला. प्रेक्षकांनी मला एवढं काही दिलं आहे, की त्या बदल्यात मी काही परतफेड करू शकलो तर ते माझं भाग्यंच, असं अल्लू म्हणाला. व्यावसायिक चित्रपटांच्या बाबतीत मी बरीच काळजी घेतो. माझ्या मुलांना चित्रपट पाहताना कोणताच संकोच वाटणार नाही. केवळ मुलेच नव्हे तर मातांना सुद्धा संकोच वाटू नये. मी अशा चित्रपटात कधीच काम करणार नाही जे चित्रपट पत्नी आणि मुलांसोबत पाहू शकणार नाही, असे अल्लूने स्पष्ट केले.