जोडीदारासोबत विमानाच्या वॉशरूममध्येच करण जोहरने केले "ते" कृत्य ! म्हणाला तुम्हाला माहीतच आहे मी कसा आहे ते! छोट्याशा जागेत..

 
मुंबई(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): करण जोहर हा त्याच्या कॉफी विथ करण ७ ने सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या या रियालिटी शो मध्ये बडे बडे सेलिब्रिटी सहभागी होतात. त्यात अनेक जण आपल्या व्यक्तिगत जीवनाशी बरीच गुपिते उघड करीत असतात. दरम्यान करण ने स्वतः विषयीच एक खुलासा करून खळबळ उडवून दिली आहे. विमानाच्या वॉशरूम मध्येच त्याने त्याच्या पार्टनर सोबत संभोग करण्याचा प्रयत्न केल्याचे त्याने सांगून टाकले. तो आणि त्याचा पार्टनर पकडले जाणार होते मात्र नशिबाने आम्ही वाचलो असेही करण जोहरने सांगितले.

 त्याचे झाले असे त्याच्या कॉफी विथ कार्यक्रमात टायगर श्रॉफ आला होता. शो दरम्यान तू एखाद्या विचित्र जागी सेक्स केला आहेस का असा प्रश्न करण ने टायगर ला विचारला होता. त्यावर ते खूप विचित्र नव्हत मात्र आकाशात अस काही नक्कीच आव्हानात्मक होत असे टायगर म्हणाला. त्यावर विमानात सेक्स करणाऱ्यांमध्ये तू सुद्धा आहे तर असे करण म्हणाला. त्यानंतर करण जोहरने स्वतःचा अनुभव सांगितला.
 मी पण असा प्रयत्न केला होता. तुम्हाला माहित आहे की माझ्यासाठी छोटीशी जागा , छोटेशे बाथरूम पुरेसे नाही. माझ नशीब चांगल मी ते करतांना पकडलो गेलो नाही. मात्र ती परिस्थिती विचित्र होती असे करण  जोहर म्हणाला.