कपिल शर्माकडे आहे "एवढी' संपत्ती!; लोकांना हसवता हसवता कमावले कोट्यवधी!!
Feb 13, 2022, 13:26 IST
यश सहजासहजी मिळत नसते. त्यासाठी अनेक संकटांना तोंड देण्याची तयारी दाखवावी लागते. कॉमेडियन कपिल शर्मा आज ज्या उंचीवर पोहोचला आहे त्यामागे त्याचा संघर्ष आहे. एकेकाळी कपिल शर्माने रुमाल विकण्याचेही काम केले आहे. एका टेलिफोन बूथवर सुद्धा कपिल शर्माने नोकरी केली आहे. सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या कपिलने आता स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. कपिलच्या वडिलांचे कॅन्सरने निधन झाल्यानंतर कपिल खूप खचला होता.
वडिलांच्या जागेवर पोलीस शिपाई म्हणून काम करण्यास कपिलने नकार दिला होता. मात्र आज कपिलने त्याच्या अभिनयाने करोडो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कपिलकडे सध्या २८२ कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती आहे. तो कॉमेडी शोच्या माध्यमातून करोडो रुपये कमावत आहे. एका शोच्या माध्यमातून तो ४० ते ९० लाख रुपये एवढी कमाई करतो. त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. स्वतःची व्हॅनिटी व्हॅन असून, तिची किंमत साडेपाच कोटी रुपये इतकी आहे. रॉयल एनफिल्ड बुलेट ५०० सुद्धा आहे. याशिवाय १ कोटी ४० लाख रुपयांची मर्सिडीज बेंझसुद्धा त्याच्याकडे आहे.