अभिनेत्री शर्वरी वाघ स्वतःला समजते भाग्यवान!; कारण...

 
बंटी और बबली २ या चित्रपटात अभिनयाची जादू दाखवणारी अभिनेत्री शर्वरी वाघ सध्या तिच्या कामात खूपच व्यस्त आहे. नुकताच तिने एका वृत्तपत्राशी संवाद साधला. यावेळी तिने तिच्या करिअरबद्दल व आगामी चित्रपटांबद्दल दिलखुलास चर्चा केली

मोठ्या संघर्षानंतर तू इथपर्यंत कशी आणि महिला दिनानिमित्त काय संदेश देशील या प्रश्नावर शर्वरी म्हणाली, की आता काळ बदलत आहे. मुली आणि महिलांना त्यांचे जीवन सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळत आहे. मला जे करायचे होते ते निवडण्याचा अधिकार मिळाला. त्यामुळे मला पुढे जाण्याची संधी मिळाली. जगात अनेक महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी आपल्या व्यावसायिक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी धैर्य आणि कठोर परिश्रम केले पाहिजेत, असे शर्वरी वाघ म्हणाली.

बॉलिवूड इंडस्ट्रीत महिलांपेक्षा पुरुषाला जास्त महत्त्व दिलं जातं का, यावर बोलताना ती म्हणाली, की इथे पुरुष कलाकारांनाच फार महत्त्व दिलं जातं असं मला वाटत नाही. अभिनेत्यांच्या जास्त भूमिका आहेत की अभिनेत्रींच्या जास्त भूमिका आहेत हे चित्रपटाच्या कथानकावर अवलंबून असते. यासाठी काही चित्रपटांचे उदाहरण तिने दिले. तापसी पन्नूचा चित्रपट थप्पड, आलिया भट्टचा गंगूबाई काठियावाडी चित्रपट यावरून अभिनेते आणि अभिनेत्रींना समान दर्जा मिळतो असे मला वाटते, असे शर्वरी म्‍हणाली. आजघडीला स्त्रीकेंद्रित चित्रपट जास्त तयार होत आहेत आणि विशेष म्हणजे जेव्हा असे चित्रपट बनत आहेत त्या क्षणी मी इंडस्ट्रीत आहे हे माझे भाग्य आहे, असे शर्वरी म्हणाली.