Chnaderi News हृता दुर्गुळे म्हणाली " माझ्यासमोर आता हेच खरे मोठे आव्हान"...

 
hrata
मुंबई( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची चुणूक दाखवल्यानंतर  अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने मोठ्या दिमाखात मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. आपल्या सोज्वळ हास्याने तिने महाराष्ट्रातील तरुणाईच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

दरम्यान हृता तिच्या २९ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी नवरा प्रतिकसोबत विदेशात गेली आहे. तेथील काही फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अपलोड केले आहेत. हृता नुकतीच टाईमपास ३ आणि अनन्या या चित्रपटात दिसली होती. मोठ्या पडद्यावरील तिची भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरली. दरम्यान सध्या हृता ची एक मुलखात व्हायरल झाली असून त्यात ती तिला वाटत असलेल्या आव्हानाबद्दल बोलते.

हृता म्हणते की मला भाषा नेहमीच आव्हानात्मक वाटते. कारण आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणची भाषा वेगळी असते. याशिवाय प्रत्येक व्यक्तीरेखेत ती बदलत असते. त्यामुळे सगळ्या बोलीभाषा शिकणे हे माझ्यासाठी आव्हान आहे असे हृता म्हणाली. टाईमपास ३ मध्ये पालवी साकारताना तिची रावडी भाषा आव्हानात्मक होती असेही ती म्हणाली.