Chanderi News आलिया भट्टवर वरुण धवन नाराज? या कारणामुळे रंगतेय चर्चा
Apr 20, 2022, 10:19 IST
मुंबई:- बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांचा शाही विवाह नुकताच पार पडला. आलिया आता कपूर कुटुंबाची सून झाली आहे. सोशल मीडियावर आलिया आणि रणबीरच्या लग्नाचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान आलिया भट्ट ने ज्याच्यासोबत बॉलिवूड मध्ये पदार्पण केले तो वरुण धवन सध्या आलियावर नाराज असल्याची चर्चा रंगत आहे. आलिया आणि वरुण धवनने 'स्टुडंट्स ऑफ द इयर" या चित्रपटातून एकत्रित पदार्पण केले होते.
सोशल मीडियावर सध्या वरून धवनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तो अतिशय घाईत असल्याचे दिसते तरीसुद्धा पत्रकारांनी त्याला घेरले. तुझ्या खास मैत्रिणीचे लग्न झालेय काय सांगशील असा प्रश्न त्याला विचारल्यावर त्याने जुग जुग जियो एवढेच उत्तर दिले आणि निघून गेला. विशेष म्हणजे जुग जुग जियो हा वरुण धवनचा आगामी चित्रपट आहे.
वरुण आणि आलिया दोघेही चांगले मित्र आहेत. दोघांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केले आहे. सुरुवातीला वरुण आणि आलियाच्याच अफेअरची चर्चा रंगली होती. मात्र दोघांनी कधीही मैत्रीव्यतिरिक्त त्यांच्या वेगळ्या नात्याचा स्वीकार केला नव्हता. दरम्यान आलियाच्या लग्नाला वरुण धवनने हजेरी लावली नसल्याने तो नाराज असल्याची चर्चा आहे. शिवाय पत्रकारांनी प्रश्न केल्यावर सुद्धा तो जास्तीचे न बोलल्याने तो नाराज असल्याचे मानल्या जात आहे.