Chanderi News : अभिनेत्री उर्फी जावेदचा धक्कादायक आरोप! म्युझिक व्हिडिओत काम देण्यासाठी झाली शरीरसुखाची मागणी!!
अनेक मुलींनीसुद्धा ओबेदच्या तक्रारी केल्या आहेत. त्या मुली माझ्याशी बोलल्या आहेत. उर्फीने अनेक मुलींसोबत झालेल्या संवादाचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. काम देण्यासाठी तो न्यूड व्हिडिओ कॉलची मागणी करत होता व शारीरिक सुखाची मागणी करीत होता, असे अनेक मुलींचे म्हणणे आहे. दरम्यान डायरेक्टर ओबेदरीदी याने सोशल मीडियावर त्याच्याविरुद्ध करण्यात आलेल्या आरोपांना फेटाळले आहे.
जेव्हा त्यांच्याकडे काही काम रहात नाही तेव्हा ते बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, असे ओबेदने सोशल मीडियावर लिहिले आहे. त्यानंतर उर्फीने डायरेक्टरला उत्तर देताना लिहिले, की मी अनेकांसोबत काम केले आहे. तुम्ही चांगले काम केले असते तर आम्ही कशाला आरोप केले असते? माझ्याकडे अनेक पुरावे आहेत. त्याने तरुण मुलींच्या समोर हस्तमैथुन केले आहे, असे उर्फीने लिहिले आहे. मी त्याच्याविरुद्ध लढत आहे. तो दरिंदा आहे. त्याच्या आसपास असणाऱ्या मुली सुरक्षित नाहीत हे मी सर्वांना सांगू इच्छिते. मी पैसे कमावण्यासाठी मेहनत करते. हक्काचे पैसे मागितले म्हणजे तो गुन्हा ठरत नाही मात्र मुलींना शरीरावरून टॉर्चर करणे गुन्हा आहे, असे उर्फीने पोस्टमध्ये लिहिले आहे.