रश्मिका मंदाना म्हणाली, विजयला समजून घेण्यासाठी मला कष्ट पडत नाहीत...
दोघेही एकदा मुंबईत डिनर डेटसाठी व काही दिवसांपूर्वी गोव्याच्या ट्रिपवर जाताना दिसले होते. एका मुलाखतीत रश्मिकाने ती विजयला घाबरत असल्याचा खुलासा केला होता. रश्मिका आणि विजयच्या केमिस्ट्रीचे लाखो चाहते आहेत. डिअर कॉम्रेड आणि गीता गोविंदम चित्रपटात ते एकत्र दिसले होते. डिअर कॉम्रेडच्या प्रमोशन दरम्यान ती म्हणाली होती, की मी जेव्हा विजयला भेटले तेव्हा त्याला पाहून घाबरले होते.
मात्र त्यानंतर तो खूप चिल फेलो असल्याचे मला कळलं. आमच्या दोघांचे विचार एकमेकांशी जुळतात. आमच्या मैत्रीतील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्याला समजून घेण्यासाठी मला फार कष्ट करावे लागत नाहीत, असे रश्मिका म्हणाली. रश्मिका आणि विजय दोघांची जोडी सोशल मीडियावर सुद्धा प्रचंड लोकप्रिय आहे. दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेक जण प्रेम व्यक्त करण्यासाठी त्या दोघांचे फोटो आपल्या व्हॉटस् ॲप स्टेटसवर ठेवतात. इन्स्टाग्रामवर त्या दोघांच्या नावाने अनेक पेज बनवण्यात आले आहेत.