Chanderi News काश्मिर फाईल्स ज्यांना भूतकाळ वाटतो ते चुक आहेत,कारण....विवेक अग्निहोत्रींचा गंभीर आरोप!

 
453
नवी दिल्ली: दिल्लीत हनुमान जयंतीच्या दिवशी झालेल्या हिंसाचारावर काश्मीर फाईल्स चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. काश्मिर फाईल्स ज्यांना भुतकाळ वाटतो ते चूक आहेत अस विवेक अग्निहोत्री त्यांच्या ट्विट मध्ये म्हणाले. हनुमान जयंतीच्या दिवशी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराचा व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला आणि हा पहा पुरावा असेही ट्विट मध्ये म्हटले आहे.
 ज्यांना काश्मीर फाईल्स भूतकाळ वाटतो, ते चूक आहेत. काश्मिर फाईल्स भारताच्या भविष्याचा ट्रेलर होता. हनुमान जयंतीच्या मिरवणुकीचा हा पहा पुरावा असे ट्विट विवेक अग्निहोत्री यांनी केले. त्यांचे ट्विट सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. त्यांच्या ट्विटवर लोक  वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. भारताला हिंदुराष्ट्र घोषित केल्यास देशातील कट्टरतावाद थांबेल अशी कमेंट एका युजरने केली आहे.