Chanderi News.....म्हणून इच्छा असतांना सुद्धा आलिया भट्टने लग्नात नाही घातल्या बांगड्या!

 
5635
मुंबई:-  आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या विवाहाची देशभरात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. १४ एप्रिलला दोघेही लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाचे विविध फोटो आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. १० दिवसांच्या  नियोजनात दोघांचे विवाह थाटामाटात पार पडला. १३ एप्रिलला  साखरपुडा आणि १४ एप्रिलला लग्न अशा दोन दिवसांतच हळदी, मेहंदी,संगीत असे विधी पार पडले. मात्र बांगड्या भरण्याचा पारंपरिक विधी आलियाने केलाच नसल्याचे आता समोर आले आहे.

एकदा बांगड्या घातल्यानंतर नववधूला किमान ४० दिवस ते १ वर्षांपर्यंत बांगड्या घालाव्या लागतात असा नियम आहे. मात्र आलियाला लवकरच तिच्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार असल्याने 
तिने बांगड्या घातल्या नसल्याचे सांगण्यात येत आहे. आलियाचा हा पहिलाच हॉलिवूड चित्रपट असून या चित्रपटात ती हॉलिवूड अभिनेता गल गॅटोडसोबत दिसणार आहे.

 आलियाची आई रणबीरची सासू सोनी राजदानने लाडक्या जावयाला अडीच कोटी रुपयांची घड्याळ गिफ्ट दिली. लग्नात आलेल्या पाहुण्यांना आलियाने काश्मीर शाल भेट दिल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे बुट चोरीचा कार्यक्रम या जोडप्याच्या लग्नात सुद्धा करण्यात आला. आलियाच्या मैत्रिणींनी रणबीर कपूरचे बुट चोरले आणि बुट परत देण्यासाठी तब्बल साडेअकरा कोटींची मागणी केली.. अखेर १ लाख रुपये देऊन रणबीरने बुट मिळवलेच.