CHANDERI NEWS रणबीर आणि कतरिनाचे बीचवरील खासगी फोटो पाहिल्यावर भडकला सलमान खान!म्हणाला, तुमच्या बहिणीचे.....
May 2, 2022, 09:34 IST
मुंबई: अभिनेता सलमान खानच्या आतापर्यंत झालेल्या गर्लफ्रेंडची लिस्ट खूप मोठी आहे. मात्र अजूनही पन्नाशीपार पोहचलेल्या सलमानने लग्न केले नाही. याआधी अनेकदा त्याचे नाव वेगवेगळ्या जोडले गेले, लग्नाच्या चर्चाही झाल्या, मात्र त्यानंतर काही दिवसांत ब्रेकअपच्या बातम्या येत होत्या. त्यामुळे सलमानचे नाते फार काळ कुणाशी टिकले नाही. एके काळी तो कतरिना कैफ सोबत सुद्धा संबंधात होता. मात्र रणबीर कपूर आणि कॅटरिनाची जवळीक वाढली, दोघांचे बीचवरील कुणीतरी चोरून काढलेले फोटो सलमानने पाहिले. त्यात कॅटरिनाने बिकनी घातलेली होती..ते फोटो पाहून सलमान प्रचंड संतापला आणि त्याचे कॅटरिनाशी फाटले आणि दोघांचे ब्रेकअप झाले.
ब्रेकअप होण्याआधी सलमाननेच कॅटरिनाला बॉलिवूडमध्ये आणले होते. त्यानंतर जवळपास ४ वर्षे सलमान आणि कॅटरिना रिलेशशिपमध्ये होते. दोघांच्या लग्नाच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या. मात्र ४ वर्षानंतर सलमान आणि कॅटरिनाचे ब्रेकअप झाले होते. ब्रेकअप चे नेमके कारण समोर आले नसले तरी रणबीर कपूर आणि कॅटरिनाची त्यावेळी वाढलेली जवळीक आणि दोघांचे बीचवरील कमी कपड्यातील फोटो हे त्यांच्या ब्रेकअपचे कारण असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
कॅटरिना आणि रणबीरच्या त्या व्हायरल झालेल्या प्रश्नांवर जेव्हा पत्रकारांनी सलमान खानला प्रश्न केला तेव्हा तो प्रंचंड संतापला होता. जर तुमच्या बहिणीचे , बायकोचे आणि गर्लफ्रेंडचे असे फोटो कुणी लीक केले तर तुम्हाला कसे वाटेल असा प्रतिप्रश्न सलमानने पत्रकारांना केला होता.