अनुष्का सेनने सोशल मीडियाला लावली आग!

 
मुंबई : बालवीर या टीव्ही मालिकेतील मेहर अर्थात अनुष्का सेन आता मोठी झाली आहे. ती खूपच सुंदर अन्‌ ग्लॅमरस दिसते. सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते असून, ती तिचे फोटो शेअर करत असते. सध्या ती मालदीवमध्ये सुट्या मनवत असून, तिथले काही फोटो तिने सोशल मीडियावर टाकले आहेत. फोटोत ती घोडेस्वारी करताना, तर काही फोटोत पाण्याचा आनंद घेतानाचे आहेत.

anushka sen

होळी तिने मालदीवमध्येच साजरी केली. तिने तिचे काही बिकिनीवरील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत. तिच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. कामाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास अनुष्का मागील वर्षी रोहित शेट्टीच्या खतरो के खिलाडी या शोमध्ये सहभागी झाली होती. तिने झाशीची राणी या मालिकेत मणिकर्णिकाची भूमिका साकारली होती. मात्र २०१२ मध्ये आलेल्या बालवीरमधूनच तिला खरी ओळख मिळाली.